जयहिंद गोरक्षण गोशाळा कानडी माळी व सह्याद्री प्रतिष्ठान बीडच्या वतीने संकटात कर्तव्यपूर्ती, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीफराळ,किराणा किट वाटप

केज/प्रतिनिधी
मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भुम ,परांडा तालुक्यातील लाखी, ईडा,आंतरगाव या गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर,त्यांची आगामी दिवाळी गोड व्हावी यासाठी हा मदती चा नाही,तर कर्तव्य पार पाडले सह्याद्री प्रतिष्ठाण बीड आणि जय हिंद गोरक्षण गोशाळा कानडी माळी यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी दिवाळीसाठी 121 किराणा किट वाटप करण्यात आलेल्या कठीण काळात,आपल्या बांधवांना आधार देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
या उद्देशाने शेतकरी बांधवांना आर्थिकसंकटात गोर गरीब शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्या साठी जय हिंद गोरक्षण गोशाळा कानडी माळी व सह्याद्री प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिवाळी फराळ व किराणा किटचे अतिवृष्टी पुरग्रस्त शेतकऱ्यांनावाटप करण्यात आले.आर्थिक मदत करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आपल्या मदतीमुळे,अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचे हास्य फुलवू शकले.सहभागी ऋषिकेश जाधव,सिध्दार्थ (सोनू) राऊत,अशोक खेत्रे,भारत राऊत,पुष्पक गिरमे या नंतर ही मदतकार्य सुरूच राहणार आहे जेव्हा मदतीची गरज पडल्यास असे अशोक खेत्रे व सहकार्यानी म्हटले आहे. मदत करणाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.



