वाणिज्य

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान मार्फत नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्सचेंज लिमिटेड (एन.सी.डी.ई. एक्स)च्या माध्यमातून एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

अंबाजोगाई/प्रतिनिधी

दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच नॅशनलकमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्सचेंज लिमिटेड (एन.सी.डी.ई.एक्स) च्या माध्यमातून वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच एनसीडीइ एक्स चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.

यात त्यांनी विद्यार्थ्यांना डिमॅट अकाउंट, कमोडिटी मार्केट मध्ये असलेल्या एग्रीकल्चर व नॉन एग्रीकल्चर असलेल्या विविध कमोडिटीची ओळख करून दिली तसेच कमोडिटी व सिक्युरिटीज मध्ये असलेला फरक समजावून सांगितला, एक्सचेंज फंक्शनिंग, प्राईस डिस्कवरी, ऑनलाइन ट्रेडिंगचे फायदे, ट्रेडिंग करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे तसेच काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचे निवारण कसे करायचे इत्यादीचे सखोल असे मार्गदर्शन केले.तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उप प्राचार्य डॉ.रमेश शिंदे सर,प्रा.रामेश्वर जगदाळे सर , प्रा.दिगंबर व्हनडर कर सर, प्रा.मोरे सर यांनी परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले.तसेच सूत्र संचालन वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.ईश्वरसिंह छानवाल सर यांनी केले.या कार्यक्रमास कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!