केज शहरात कन्हैय्या इव्हेंन्टस् कडून दांडिया महोत्सवाचे आयोजन

केज/प्रतिनिधी
नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून केज शहरामध्ये कन्हैय्या इव्हेंन्टस् यांच्याकडून उत्सव फंक्शन हॉल, देशमुख कॉम्पलेक्स, कानडी रोड, केज येथे दि.26,27,28 सप्टेंबर 2025 दरम्यान रोज सायंकाळी 7- 00 ते 10-00यावेळेत दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवा दरम्यान महिलांसाठी नाममात्र 100 रुपये प्रवेश शुल्कासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तीन दिवसीय महोत्सवामध्ये महाराष्ट्रीयन मराठमोळी ड्रेसिंग दांडिया,रंगीलो गुजरात व रंगीलो राजस्थान या स्पेशल थीम वर दांडियाघेण्यात येणार आहेत.तसेच दांडिया महोत्सवात दांडिया थीम सह महिलांसाठी विविध सेल्फीपाँईंटस्, आकर्षक विद्युत रोषणाई , सांऊड सिस्टम व डेकोरेशन करण्यात येणार आहे.
या दांडिया महोत्सवात मर्यादित40 महिलांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.तसेच सहभागी महिलांना सन्मानचिन्ह देवून यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे कन्हैय्या इव्हेंटसचे संचालक रोहन वेदपाठक यांनी सांगितले.महिलांच्या सुरक्षिततेसाठी कन्हैय्या इव्हेंटस् यांच्या कडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.



