प्रशासकीय

बीड जिल्ह्यातील महसूली गाव रूपांतरण अधिसूचनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मूक महसूली गावाच्या गावठाणाच्या हद्दी बाहेरील किमान 300 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या वाड्या तांडे वस्तीस महसुली गावात रुपांतर करण्याची अंतिम अधिसूचना होती व दिनांक 28 फेब्रुवारी 2011 रोजी प्रसिद्ध करण्याकरिता व्यवस्थापक शासकीय मुद्रणालय यांना देण्यात आली होती.परंतु सदर अधिसूचनेनुसार अद्याप ही कार्यवाही करण्यात आलेली नाही.सदर आधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

केज तालुक्यातील सोने सांगवी,काळूचीवाडी, कदमवाडी,नामेवाडी, लिंबाचीवाडी,बेंगळ वाडी,मानेवाडी, खाडेवाडी,खोमणवाडी या वाड्यांचे महसूल विभागात रूपांतर करण्यासाठी आ.नमिता मुंदडा यांनी मा. जिल्हाधिकारी बीड यांना दिनांक 19 मे 2025 जा.क्र 937/ 2025 पत्र दिले होते.

तहसीलदार केज यांनी यावर कार्यवाही करण्या करिता संबंधित वाड्यांच्या मंडळ अधिकाऱ्यांना दि.4 जुन 2025 रोजी पत्र काढून उपरोक्तवाड्यांचे गट क्रमांक,सर्वे क्रमांक क्षेत्र,आकार इत्यादी माहिती व स्वयं स्पष्ट अहवाल सादरकरण्याचे आदेश दिले होते.हे सर्व माहिती अहवाल मा. जिल्हाधिकारी बीड यांना सादर करून दीड महिना लोटला तरी या बाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

खाडेवाडी हे गाव रामेश्वरवाडीग्राम पंचायत अंतर्गत येते. मात्र स्वतंत्र महसूली दर्जा नसल्याने गावाच्या लोकसंख्येनुसार येणारा वित्त आयोगाचा निधी नांदुरघाट तालुका केज या ग्रामपंचायतला वर्ग होतो परिणामी गावात विकास कामे करताना अडचणी निर्माण होतात.महसूली गावात रूपांतर होणे योग्य असलेल्या इतर वाड्या पवारवाडी,आगेवाडी, बंदेवाडी तालुका केज जिल्हा बीड अशा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!