वैद्यकीयसामाजिक

एच.आय.व्ही /एड्स हा रक्तातील संसर्गाने होतो – साकसमुद्रे

केज/प्रतिनिधी

बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहिती व्हावी यासाठी येथील उप जिल्हा ग्रामीणरुग्णालय केजच्या एकात्मिक समुपदेशन व चाचणी विभाग इंटेन्सिफाइ अवेअरनेस कॅंपेन अंतर्गत किशोरवयीन मुलां मुलीकरिता एच.आय.व्ही.एड्स जनजागृती अभियान अंतर्गत येथील विद्यार्थ्यांना समुपदेशक करण्यासाठी उपजिल्हा.

रुग्णालयातील समुपदेशक श्रीमती साकसमुद्रे मॅडम यांनी एच.आय.व्ही.या संक्रमित रोगाविषयी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी त्यांनी सांगितले की,या संक्रमित रोगाविषयी महाराष्ट्रभर माहिती देण्याचे काम चालू आहे हा संक्रमित रोग सर्वप्रथम चिंपाझी नावाच्या माकडामध्ये आढळून आला.

आफ्रिका या देशामध्ये एच आय व्ही रुग्ण आढळला होता.हा रोग संक्रमित रक्ताने हा विषाणू मानवाच्या रक्तात आला.या रोगाने जागतिक रुप धारण करून जगात सर्वच देशात या रोगाचे रुग्ण आढळले या रोगापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी व्यासपीठावर कु. साक्षी कराड, हरिभाऊ पाटोळे ,केज उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ फारोकी मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!