डॉ.दत्ता तपसे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी संपन्न -ज्ञानेश्वर गिरी

केज/प्रतिनिधी
श्री क्षेत्र राम वडगाव येथे राजमुद्रा मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष, तसेच कार्ला येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर संपन्न झाले.या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, कर्करोग तपासणी, सिबीसी ब्लड टेस्ट, रक्तदाब, मधुमेह, तपासण्या करण्यात आल्या.
याशिबिरासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली या मध्ये राम वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.केशव सारुक, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महा विद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन साखरे,डॉ.राहुल मुंडे, प्राथमिक आरोग्य केंद्र राजेगांव चे डॉ.नवनाथ घुले,बाल आरोग्य अधिकारी डॉ.शीतल डोईफोडे ,डॉ.सुमित मुंडे केज उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान घुगे, डॉ.सचिन राऊत, ससून हॉस्पिटल पुणे चे जनरल सर्जन डॉ. अन्तेश्वर वडमिलवार, श्रीशा फार्मा केज चे डीआरएक्स अविनाश बोराडे, डीआरएक्स लाळासाहेब ढाकणे , डीआरएक्स ज्ञानेश्वर गिरी ,डीआरएक्स विशाल शिंदे , आॕपथेल्मिक तज्ञ अविनाश अघोर,प्रीतम बचूटे,बाप्पासाहेब सोनवणे,प्रा.अशोक देवकर यांनी मोलाचे योगदान दिले या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते रिपाई मराठवाडा प्रवक्ता ज्ञानेश्वर गिरी, युसूफवडगाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मल्लिकार्जुन गडकर सर वृक्षवली सेवाभावी सचिव राहुल केंद्रे, रामराव फौंडेशनचे सचिव बन्सीलाल भालेराव, युवा नेते किरण सातपुते,युवा नेते नितीन बचूटे लिंगेश्वर लामतुरे,किरण जावळे,शंभु चोपने आदि सर्वांच्याउपस्थिती मध्ये शिबीर संपन्न झाले.



