घरकुलचे नवीन हप्ते पहिला, दुसरा,व तीसरा तात्काळ वाटप करा शिष्टमंडळाची मागणी अन्यथा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिना दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने करणार

बीड/प्रतिनिधी
बीड शहर नगरपालिका परिसरातील घरकुलचा पहिला दुसरा तिसरा थकीत हप्त्यांसाठी शिष्टमंडळांनी घेतली शेवटची भेट घेत दि.4 सप्टेंबर 2025 रोजी शिष्टमंडळाने पुन्हा एकदा न.प. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची समक्ष भेट घेऊन रमाई घरकुल आवास योजनेचे थकित आणि नवीन हप्ते पहिला दुसरा आणि तिसऱ्याची तात्काळ वाटप करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रमाई घरकुल योजनेचा पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता तात्काळ न दिल्यास दि. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिना दिवशी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात येतील असा इशारा शिष्टमंडळाने न.प. मुख्याधिकारी शैलेश पडसे यांना देण्यात आला.
सदरील शिष्टमंडळात सर्व चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक उपस्थित होतेत्यात बबन वडमारे, गणेश वाघमारे,अँड. राहुल मस्के,अशोक वीर,भीमराव वाघचौरे, विकास,जोगदंड अमोलजी पोळ, विनोद सवाई,स्वप्निल हातागळे इत्यादी यावेळी भारत सोन्नर पण उपस्थित होते.न.प.मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी शिष्ट मंडळास रमाई घरकुल योजनेचे हप्ते तात्काळ वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे.



