केज महावितरणच्या दबंग कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांची पुढाऱ्यांच्या दबावामुळे १५ वर्षांत तब्बल ९ वेळा बदली,ईतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही सन्मान करावा –शितल सय्यद

केज/प्रतिनिधी
कर्तव्याशी प्रामाणिक राहून जबाबदारी पार पाडणारे अधिकारीच खऱ्या अर्थानेसमाजाचा कणा ठरतात.मेहनती, प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांनाप्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर राजकीय दबाव आणून वारंवार बदलीलासामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आपल्या समोर आहे.
याचाच अनुभव महावितरणच्या दबंग कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांना गेल्या १५ वर्षांत तब्बल ९ वेळा बदलीचा अनुभव आला आहे.दि.३ जुलै २०२५ रोजी त्या केज महावितरण कंपनीला रुजू झाल्या.रुजू होताच प्रलंबित कामांचा ढीग, विजचोरी,थकीत बिले, नागरिकांचा असंतोष अशी बिकट परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. महावितरणची डळमळीत झालेली प्रतिमा सुधारण्याचा त्यांनी निर्धार केला आणि लगेचच वसुली मोहीम हाती घेतली. परिणामी जुलैमहिन्यात तब्बल १०४ टक्के,तर ऑगस्ट महिन्यात १०८ टक्के वसुली करून त्यांनी प्रशासनाला आश्चर्यचकित केले.
याचबरोबर विजचोरीला आळा घालण्यासाठी त्यांनी मोहीम राबवली. पावसाळा असो वा उन्हाळा स्वतः कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरत डीपी दुरुस्तीची कामे,विज चोरी पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. नैतिकतेला धरून कार्य करण्याची त्यांची तळमळ पाहून सामान्य ग्राहक आनंदी झाले. मात्र नेहमीप्रमाणे काही स्थानिक पुढाऱ्यांनी दबाव टाकण्याचाप्रयत्न केला.
असंविधानिक कामे करण्याचे आदेश देण्यात आले.मात्र शितल सय्यद यांनी न डगमगता “कर्तव्याशी तडजोड नाही” या भूमिकेवर ठाम राहून कार्य सुरु ठेवले.आज केज महावितरणची डळमळीत प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली होत असून, महावितरण कार्यालया मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना ही इतर सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणेच सन्मान मिळायला हवा अशी मागणी शितल सय्यद यांनी केली आहे.



