शैक्षणिक
केज येथील भुमीपुत्र मारुफ शेख सेट परिक्षेत उत्तीर्ण, मित्र मंडळी कडून शुभेच्छांचा वर्षाव

केज/प्रतिनिधी
केज शहरातील भुमीपुत्र मारुफ शेख हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा युजीसी द्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या सेट परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.लोक प्रशासन पब्लिक एडमिनिस्ट्रेशन या विषयात सेटपरिक्षेत केज तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी फजलभाई शेख यांचे चिरंजीव मारुफ शेख यांनी यश मिळविले आहे.त्यांच्या या यशा बद्दल मारुफ शेख यांचे मित्र परिवार यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शेख परिवाराचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.



