पत्रकार चंद्रकांत पाटील यांचा शिवसेना कार्यालयात सत्कार समारंभ संपन्न,आचार्य बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट तालुका प्रतिनिधी पुरस्काराने गौरव

केज/प्रतिनिधी
समर्थ राजयोगच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार चंद्रकांत पाटील यांची बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाली.या यशाबद्दल शिवसेना कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाला शिवसेना तालुकाप्रमुख पृथ्वीराज सुरेशराव पाटील,शिवसेना विधानसभा प्रमुख दादासाहेब शंकरराव ससाणे,युवासेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे,युवासेना उप तालुकाप्रमुख शिवाजी गायकवाड, विठ्ठल झाडे, विनोद महाजन, ज्ञानेश्वर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांनी पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,ग्रामीण भागातील समस्या व जनतेचे प्रश्न समाजापुढे मांडण्याचे उल्लेखनीय कार्य ते सातत्याने करीत आहेत.त्यांच्या या पत्रकारितेच्या योगदानामुळेच त्यांना हा बहुमान मिळाला आहे.पत्रकार चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी सर्व मान्यवरांचे आभार मानले.हा पुरस्कार माझ्या पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत मिळालेला सन्मान असून यामुळे आणखी जबाबदारी वाढली आहे.समाजहितासाठी निष्पक्षपणे लेखणी चालवत राहीन असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तकुमार काकडे यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवाजी गायकवाड यांनी मान्यवरांचे मानले.



