सामाजिक

एस.आय.आर चे काम मतदार नोंदणी अधिकारी यांनी गांभीर्याने घ्यावे -प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

एस.आय.आर प्रक्रिया राबविताना मतदार यादी मध्ये असलेल्या अनेक त्रुटी शासना सह प्रशासनाला लक्षात आलेल्या आहेत मतदार यादी दुरुस्त करण्या करिता निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेली एस.आय‌. आर प्रक्रिया या प्रक्रियेतील संबंधित प्रशासनिक अधिकारीच याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून आले सन २००० च्या असो की २००२ च्या किंवा २००५ प्रत्येक मतदार यादी मयत मतदाराची नावे आहेत विवाह होऊन जिल्ह्यातील बाहेर गेलेल्या महिलांची नावे मतदारांचे पत्ते आणि वय यात भरपूर तफावत आहे.

या असंख्य चुका असताना अशा सदोष मतदार याद्या घेऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासन एस.आय.आर. जिल्ह्यात राबवित असल्याने या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्यासह भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य आयुक्त यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय बीड निवडणूक विभाग यांनी दिनांक ३० मार्च २०२४ रोजी मतदान नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना संदर्भ देऊन प्रशासकीय पत्र काढले आहे.त्याबाबत दोन्ही अधिकाऱ्याने आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करावी असेही पत्र जिल्हाधिकारी यांनी सबंधित अधिकाऱ्यांच्या नावे काढलेले आहे.

त्याला एक आठवडा होऊन गेला तरीही मतदार नोंदणी अधिकारी साहेब मतदान नोंदणी करीत मतदार यादी दुरुस्त करण्याकरता कोणते पाऊल उचलले मतदार यादी मध्ये एकही मयत मतदाराचे नाव राहणार नाही आणि सन २००० नंतर विवाहित झालेल्या महिलांचे मतदार यादीत नाव एस आय आर प्रक्रियेनंतर तयार करण्यात येणाऱ्या नवीन मतदार यादी मध्ये घेण्यापासून वंचित राहणार नाही.

याकरिता प्रशासनिक अधिकारी म्हणून नेमके काय कार्यवाही करतील याबद्दल एकीकडे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी,मतदान अधिकारी तथा तहसीलदार यांची ही भूमिका शांत असल्याची दिसून येत आहे असे मत ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात मांडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!