उद्योगसामाजिक

बोरगावकरांचा स्तुत्य उपक्रम,बेरोजगार तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करुन दिला

केज/प्रतिनिधी

वाढत्या महागाईच्या काळात केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी 10 ते 20 हजार पगारावर गाव खेड्यातून लागेल त्या कामासाठी गावातील तरुणांची शहराकडे जाणारी संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.त्यामुळे आज आपल्याला गावखेडे ओसाड पडलेली पाहायला मिळतात. त्यामुळे आज गावामध्ये फक्त वयस्कर मंडळी दिसून येते त्यांची मुले शहराकडे गेल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आलेली आहे.

उतरत्या काळात आई बापाला स्वतःच्या मुलाचा देखील आधार मिळत नाही.त्यामुळे कितेक वृद्ध दांम्पत्य आज बेवारस आणि वृद्ध आश्रमात पहायला मिळत आहेत हे संपूर्ण समाजच चित्र डोळ्यासमोर ठेवून बोरगाव बु येथील नेहमी तरुणांना गाव सोडून 10 ते 20 हजार पगारासाठी पुणे,मुंबईला बाहेर जाण्यापेक्षा इथेच कामधंदा करून वयस्कर आई वडिलांचा आधार बना असे सांगणारे समाजसेवक, खंडोबा देवाचे वसारी धारक गोपाळ देव निंगुळे यांनी गावातच व्यवसाय करण्याचा सल्ला देण्या ऐवजी स्वतः कृतीतून गोपाळ देवाचा चहा ह्या नावाने चहाचे हॉटेल चालू करून गावातील तसेच केज तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी कमी भांडवली व्यवसाय कसा करायचा याच उत्तम उदाहरण दिलेले आहे.

त्यामुळं जवळपासच्या गावातील तरुण गोपाळ देवाच्या कृतीतून केलेल्या कार्याचे स्वागत करत आहेत.त्यामुळे गोपाळ देवाचे समाजाबद्दल असलेली तळमळ आणि सामाजिक कार्य दिसून येत आहे.

गोपाळ देव यांनी स्वतः छोटाव्यवसाय चालू करून गावातील व समाजातील बेरोजगार तरुणांना गाव सोडून बाहेर जाण्यापेक्षा गावातच व्यवसाय करा, निर्व्यसनी राहा व जन्मदात्या आईवडिलांचा आधार बना असा सल्ला दिलेला आहे.बोरगाव बु येथील ग्रामस्थांनी याचे स्वागत करुन तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!