सामाजिक

भारतीय जनता मजदुर संघाची देहरादून येथे बैठक संपन्न 

देहरादून/प्रतिनिधी

भारतीय जनता मजदूर संघाच्या उत्तराखंड राज्यातील संघटन विस्तारासाठी आज देहरादून येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत राष्ट्रीय सचिव आरती गौर यांच्या उपस्थितीत संघटन विस्तार,भावी कार्ययोजना तसेच श्रमिक कल्याण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय महासचिव चौधरी चरण सिंह,राष्ट्रीय सचिव लोकेंद्र तसेच उत्तराखंडच्या आरती गौर यांची प्रमुख उपस्थिती होती.दिल्लीहून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आरती गौर यांचा सत्कार केला.त्याचप्रमाणे गौर यांनीही दिल्लीतील मान्यवरांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली.

बैठकीत उत्तराखंडमध्ये भारतीय जनता मजदूर संघाचा संघटनात्मक विस्तार वेगाने करण्याचा निर्धार करण्यात आला. विविध श्रमिक वर्गांसाठी स्वतंत्र बोर्डची स्थापना, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच श्रमिक कल्याणा साठी नवीन उपक्रम राबविण्याबाबत प्राथमिक सहमती दर्शविण्यात आली.ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शांतप्रकाश जाटव यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली होती.संघटनेने राज्यातील श्रमिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत येत्या काळात ठोस आणि प्रभावीपावले उचलण्याचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान,महाराष्ट्रात संघटन कार्यात सक्रिय असलेल्या भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके,राज्य सचिव धनंजय कुलकर्णी, मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील आदी कार्यकर्त्यांचेही या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!