प्रामाणिकतेचा शिल्पकार पत्रकार प्रकाश मुंडे यांचा जीवनप्रवास आदर्शवत

केज/प्रतिनिधी
जीवन नावाच्या प्रवासात अनेक चेहरे दृष्टीस पडतात.काही चालून जातात,काही थांबतात, काही आठवणीत राहतात.पण जे हृदयात घर करतात,ज्यांच्या उपस्थितीने मनाला आधार मिळतो,ज्यांच्या स्वभावात पाण्यासारखी स्वच्छता आणि आकाशा सारखी विशालता असते, अशी माणसं फारच थोडी प्रकाश मुंडे हे त्यापैकीच एकदेदीप्यमान व्यक्तिमत्व .गत दहा वर्षांमध्ये केज तालुक्यातील पत्रकारितेचा चेहरा वेगळ्या पद्धतीने घडवणारा हा तरुण आज आपल्या सत्कार्यामुळे सर्वांचा लाडका झाला आहे.सत्याची मशाल हातात घेऊन निर्दोष कार्य करणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख केवळ पत्रकारितेपुरती मर्यादित नाही, ती जनमानसाच्या हक्काची,न्यायाची आणि विकासाची भाषा बोलणारी आहे.
कामातील काटेकोरपणा आणि कर्तृत्ववान किमया
पत्रकार प्रकाश मुंडेयांच्या कामातील काटेकोरपणा, शब्दातील प्रांजळता आणि बातम्यांतील तथ्य यामुळे ते सर्वांच्या विश्वासाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.जबाबदारी स्वीकारणे सोपे असते, पण ती प्रामाणिकपणे निभावणे ही खरी किमया आहे,आणि प्रकाश मुंडे यांनी ही किमया सिद्ध करून दाखवली आहे.
स्वभावाने ते अतिशय साधा,जणू शांत पाण्याचा प्रवाह…परंतु अंतर्मनात अपार जिद्द आणि कणखरता आहे.आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना पत्रकारिते सारख्या कठीण क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे ही त्यांच्या चिकाटीची साक्ष आहे. अस्तित्वाशी लढताना अनेक अडथळे,अनेक प्रतिकूलता येतात,पण परमेश्वरने त्यांच्या मार्गा तील प्रत्येक अडथळा हा पायरीमध्ये बदलत त्यांना पुढे वाट काढण्यास मदत केली आहे.केजशहरातील सामाजिक उपक्रमात ते नेहमी पुढे असतात.
मैत्रीचा खास धागा: धैर्य, नम्रता आणि विश्वासाचा संगम
प्रकाश मुंडे यांचा मित्र परिवार गाठीशीकड्यांनी जोडलेला नाही, तो मनाने जोडलेला आहे.मोठ्यांचा आदर आणि लहानांना प्रेम ही त्यांची खास ओळख आहे.त्यांच्या मित्रपरिवारातील डॉक्टर वासुदेव नेहरकर,सुरेश मुंडे, विजयकुमार धस, अतुल मुंडे,अतुल इंगळे, शिवाजी घुले, अप्पा हजारे,लक्ष्मण जाधव, दत्ता धस,शकिल सय्यद, सुग्रीव कराड,विजय आरकडे,अशोक सोनवणे, रवि अंधारे,मनोज मस्के, शेख सिद्धीक,अकबर इनामदार,संदीप शिंदे, विनोद गुंड,दशरथ चौरे, सुहास चिद्रवार,रामदास तपसे,चंदू चौरे, अरुण गुंड, निहाल कांबळे,दादा सिरसट,शेख मुश्ताक, किशोर नाईकवाडे या सर्वांच्या मते,”प्रकाश मुंडे हा केवळ मित्र नाही;तर धैर्य,नम्रता आणि विश्वास या तीनही गोष्टींचा संगम आहे.”



