शालेय स्तरावर घुमू लागले निवडणुकीचे वारे,बहुजन कल्याण विभागाच्या सानेगुरुजी शाळेचा स्तुत्य उपक्रम.

केज/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना लोकशाही समजावी मतदानाच्या हक्काबद्दल जनजागृती व्हावी आणि निवडणूक प्रक्रिया समजण्यासाठी गोपनीय पद्धतीने मत पत्रिकेद्वारे मुलांनी मतदानाचा हक्क बजावला.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या आणि सतत उपक्रम शील शाळा म्हणून संपूर्ण राज्यात बहुजन कल्याण विभागा मध्ये गणल्या गेलेल्या साने गुरुजी निवासी विद्यालयात मुलांनी लोकशाहीचे धडे गिरवले आहेत.दि.17 आॕगष्ट रोजी रविवारी साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.कविताताई गित्ते यांच्या मार्गदर्शनात आणि संकल्पनेतून विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक अतिशय उत्साहात पार पडली.
दोन दिवसांपूर्वी निवडणुकीची अधिसूचना ज्ञानेश्वर पवार यांनी जाहीर केली.त्याप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.प्राप्त अर्जांची छाननी करून चिन्हांचे वाटप करण्यात आले निवडणूक मतपत्रिका जाहीर करण्यात आली. उत्साहात प्रचाराला सुरुवात केली.प्रत्यक्षात रविवारी मतदानाला सुरुवात झाली.या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने मतदान केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये निवडणूकीचा उत्साह दिसून आला.



