ह.भ.प.आश्रुबा दादा गायकवाड यांनी घरी व गांवासाठी सुरु केलेली गोकुळअष्टमी व गोपाळ काल्याची परंपरा पुढे मुलांनीही चालू ठेवली

केज/ प्रतिनिधी
आनंदगांव ता.केज जि. बीड येथे 20 व्याशतका तील महान विभुती ह.भ.प.कै.आश्रुबा दादा गायकवाड यांनी गोकुळ अष्टमी कृष्ण जन्माष्टमी निमित्त सुरु केलेली ग्रंथ वाचन,भजन व गोपाळ काला गावजेवण परंपरा या वर्षीही त्यांच्या मुलांनी पुढे चालवली.
शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री गोकुळ आष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्माच्या ग्रंथाचे वाचन, भाविकांनी रात्री जागर व दि.१६ऑगस्ट २०२५ रोजी सर्व लहान मोठ्या सर्वांसाठी जात,धर्म, पंथाच्या पलिकडेजावून सर्वांसाठी गोपाळकाला केला.ह.भ.प.कै. आश्रुबादादा गायकवाड यांची चारमुले रामकृष्ण तात्या गायकवाड, नवनाथ बापू गायकवाड डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड , ज्ञानोबा काका गायकवाड यांनी एकत्रीत ही परंपरा कायम चालु ठेवल आहे. गं.भा.भागिरथी अक्का गायकवाड मुली,सुना,नातू,पणतू व महिला,पुरुष भजनी मंडळ,लहान,मोठे, ग्रामस्थ यांनी या गोपाळ काल्यात सहभागघेतला व एकत्र महाप्रसादाचा लाभ घेतला.



