बनसारोळा येथील आदर्श विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण 70 विद्यार्थ्यांनी देशभक्ती,स्वातंत्र्याचे महत्त्व आणि आपल्या देशाच्या गौरवशाली परंपरेवर आधारित विषयांवर सुंदर निबंध लिहिले.स्पर्धेचेआयोजन करताना सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. रोकडे एस.व्ही.व श्री. मांदळे एस.सी.यांनी विशेष पुढाकार घेतला. स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षक वर्गानेही सक्रिय सहकार्य केले.
मुख्याध्यापिका श्रीमती सिंधुताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य वाढीस लागले तसेच देशभक्तीची भावना दृढ झाली. विजेत्या विद्यार्थ्यांना येत्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात येणार आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यां साठी प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



