गुन्हेगारी

घराचे कुलूप तोडून १ लाख ६६ हजार रुपयाचे दागिने लंपास,खाडेवाडी येथे दिवसा ढवळ्या झाली चोरी

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील खाडेवाडी येथील खाडे कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतातील काम करण्यासाठी गेल्याची पाळत राखून दि.२० नोव्हेंबर रोजी गुरूवारी दुपारी बारा ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले १लाख ६६ हजार २०० रुपयाचे ३३ ग्राम सोन्याचे व ६५ ग्राम चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी दिवसा ढवळ्या घडली असून याप्रकरणी संभाजी खाडे यांच्या फिर्यादी वरून केज पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गून्हा नोंद झाला आहे.

केज तालुक्यातील खाडेवाडी येथील संभाजी बन्सी खाडे हे गुरूवारी सकाळी खाजगी कामा निमित्त केजला गेले होते. व त्यांच्या घरातील महिला घराजवळच असलेल्या शेतात काम करण्यासाठी गेले असता, घरी कोणीही नाही ही संधी साधून अज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप तोडून,कपाटात ठेवलेले सोन्याचे मनी,सोन्याचे पेंडल,सोन्याचे टाप्स, सोन्याची ठुशी,३ सोन्याच्या अंगठ्या मिळून एकूण ३३ ग्राम सोन्याचे जुने वापरते दागिने व चांदीचे चैन जोड व जोडवे मिळून एकूण ६५ ग्राम चांदीचे दागिने मिळून एकूण १ लाख ६६ हजार २०० रुपयाच्यादागिन्याची चोरी करून दागिने लंपास केले आहेत.

या प्रकरणी संभाजी बन्सी खाडे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी दुपारीं केज पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार राजू वंजारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!