प्रशासकीयसामाजिक

तहसीलदार शुभम पवार यांच्या पुढाकाराने कोठी ते उमरी रस्ता मोकळा ; शेतकऱ्यांकडून भव्य सत्कार

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे कोठी येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि बंद असलेला कोठी ते उमरी रस्ता खुला करण्यात केजचे तहसीलदार शुभम पवार यांना यश आले आहे.शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अत्यंत सामोपचाराने हा रस्ता मोकळा करण्यात आला असून, गावकऱ्यांनी लोक वर्गणीतून या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.या नवनिर्मित रस्त्याचे लोकार्पण शुक्रवारी तहसीलदार श्री.शुभम पवार यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.

अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कृतज्ञता म्हणून कोठी येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार साहेबांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी स्वतः तहसीलदार पवार यांनी तब्बल चार तास वेळ देऊन,जागेवर उपस्थित राहून हा रस्ता खुला करून दिला होता. त्यांच्या या तत्परतेचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

रस्ता खुला करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन आणि सामंजस्य दाखवून सहकार्य केले, त्या सर्व शेतकऱ्यांचा तहसीलदार शुभम पवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांनी दाखविलेला एकोपा आणि प्रशासना वरील विश्वास यामुळेच हा कठीण प्रश्न सुटू शकला.कोठी गावा प्रमाणेच तालुक्यातील इतर गावांमधील सर्व बंद शेत रस्ते शेतकऱ्यांच्याच मदतीने व समन्वयाने मोकळे केले जातील असे श्री.शुभम पवार तहसीलदार,केज यांनी सांगितले यावेळी ग्रामस्थ व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

या लोकार्पण आणि सत्कार सोहळ्याप्रसंगी कोठी गावचे सरपंच बापुराव पंडित शिंदे,उपसरपंच बप्पा डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी गोरे मॅडम, रामराजे डोंगरे,राजेश डोंगरे,श्रीमंत डोंगरे, अशोक नवले,अनिल शिनगारे,अशोक मुळे, पवन नवले,नितीननवले, जनक डोंगरे,शिवाजी डोंगरे, रमेश डोंगरे यांच्या सह गावातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेक वर्षांची कोंडी फुटल्यामुळे कोठी आणि उमरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, वाहतुकीचा मोठा प्रश्न कायमचा मिटला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!