शिवसेना उप तालुका प्रमुख शिवाजी गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न;शिवसेना,युवासेना पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

केज/प्रतिनिधी
शिवसेना उप तालुका प्रमुख शिवाजी गायकवाड यांचा वाढदिवस केज तालुक्यात अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याला शिवसेना आणि युवासेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह,केज तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गायकवाड यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसा निमित्त आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून युवासेना मराठवाडा निरीक्षक तथा युवासेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख बाजीराव दादा चव्हाण, डाॕ.प्रतिभाताई अशोकराव थोरात आणि डॉ.विजयप्रकाश ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील,शिवसेना विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे,केज पंचायत समितीच्या माजी उपसभापती सरोजनी ताई ससाणे,युवासेना जिल्हाप्रमुख सुजित शिंदे,युवासेना जिल्हा प्रमुख सुमित कोळपे, तसेच युवासेना जिल्हाप्रमुख श्री.पवार साहेब यांनी उपस्थित राहून शिवाजी गायकवाड यांचे अभिनंदन केले.यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोंहोचला होता केज तालुक्यातील शिवसेना आणि युवा सेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी शिवाजी गायकवाड यांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या सोहळ्याला युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत घाटूळ, युवासेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे, शिवसेना शहरप्रमुख आकाश चाळक, शिवसेना केज तालुका सचिव विकास काशीद, ज्येष्ठ नेते प्रकाश गुंड, शेतकरी सेना तालुका प्रमुख आदित्य रांजनकर शिवसेना उपतालुका प्रमुख महेंद्र चाटे आणि युवासेना उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर भांगे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.तसेच पृथ्वीराज इंगळे,ऋतुराज वळेकर, वाघमारे कळमअंबा यांच्या सह केज तालुक्यातील शिवसेना आणि युवासेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाढदिवसानिमित्त शिवाजी गायकवाड यांच्यावर दिवसभर हितचिंतक आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत होता.



