क्रांतीनगर परिसरात जॉलीबाबा मल्टी सर्विसेसचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
क्रांतीनगर,कानडी रोड, केज येथे नागरिकांना विविध ऑनलाईन, डिजिटल,बँकिंग व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’ या सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा दि.६ जुन शनिवार रोजी सकाळी सुमारे दहा वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.परिसरातील नागरिक,मान्यवर व सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.या सेवा केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) केज तालुका अध्यक्षा सौ.शितलताई लांडगे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी सेवा केंद्राची पाहणी करून नव्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील, आझाद क्रांती सेनेचे तालुका उपप्रमुख अनिल जी लोखंडे,अंगणवाडी कार्यकर्ती नेहरकर मॕडम यांच्यासह क्रांती नगर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय आणि ऑनलाईन सेवांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.
जॉलीबाबा मल्टीसर्विसेस या केंद्रा मार्फत आधार कार्ड सेवा,बँक खाते उघडणे, ई-केवायसी,मोबाईल रिचार्ज, ऑनलाईन पेमेंट, शासकीय योजनांचे अर्ज,लाडकी बहीण योजना,पीएम किसान, निराधार योजना,राशन कार्डसंबंधित सेवा तसेच इतर विविध ऑनलाईन सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.दुकानाचे प्रोप्रायटर पत्रकार पांडुरंग कसबे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.नागरिकांना विश्वासार्ह,जलद व दर्जेदार सेवा देण्याचा मानस व्यक्त करत त्यांनी या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाआवश्यक सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील,असे सांगितले.
क्रांती नगर परिसरात नव्याने सुरू झालेल्या जॉलीबाबा मल्टी सर्विसेसच्या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.



