सामाजिक

केज नगर पंचायतचे गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांच्या पाठपुराव्याला यश,चाळीस वर्षापासून चा छोट्या व्यवसाय धारकांच्या व्यवसायाचा प्रश्न मार्गी,जिरायत खात्याची जागा अखेर केज नगरपंचायतीच्या ताब्यात आल्यामुळे व्यवसाय धारकात नवचैतन्य 

केज/प्रतिनिधी

केज शहरातील मागील चार ते साडे चार वर्षा पासून सार्वजनिक विकास कामांना गती मिळत असतांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना प्रत्यक्षात अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर गेल्या अनेक दिवसां पासून प्रलंबित असलेला केज येथील छोट्या व्यवसाय धारकांच्या व्यवसायाच्या जागेचा प्रश्न मिटला आहे अशी माहिती पत्रकार परिषदे मध्ये गटनेते हारुणभाई इनामदार यांनी दिली आहे.

जिरायत खात्याची शासकीयजागा अधिकृत पणे केज नगरपंचायत प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली आहे. जागेचे ताबा पत्र महसूल प्रशासनाने अधिकृतपणे केज नगरपंचायत ला हस्तांतरित केले आहे. नगरपंचायत प्रशासना च्या वतीने मंगळवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी ही हस्तांतरण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पणे पूर्ण करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कै.अजित दादा पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई इनामदार व केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांच्या पाठपुराव्यामुळे आणि सर्व राजकीय वरीष्ठांच्या सहकार्याने

केज नगरपंचायतीला यश प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व गटनेते हारूणभाई इनामदार यांनी सदर जागेचा ताबा घेते वेळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.यासाठी गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी सर्व वरिष्ठांना आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन सातत्याने शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला,त्यांच्या या पाठपुराला यश येऊन गोरगरीब छोट्या व्यवसायिकांना आधार मिळाला आहे.केज शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेचा वापर जनहिता साठी व्हावा,यासाठी या दोन्ही नेत्यांनी सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून या महत्त्वपूर्ण कामात केजच्या विकासासाठी स्व.लोकनेते विलासराव देशमुख,माजी खासदार रजनीताई पाटील,स्व. विमलताई मुंदडा,आणि विद्यमान खासदार बजरंग बप्पा सोनवणे, विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा,ज्येष्ठ नेते रमेशरावजी आडसकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे यांचे व अप्रत्यक्ष नेतेमंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याच बरोबर केज नगरपंचायत चे मुख्याधिकारी,नगर सेवक व सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्वांच्या विशेष प्रयत्नांमुळे हस्तांतरणाचे आदेश तातडीने निघण्यास मोठी मदत झाली आहे अशा प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना इनामदार व बनसोड यांनी दिल्या आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पा साठी आणि शासकीय जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी राज्याचे दिवंगत नेतृत्व ना.अजित दादा पवार यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य व खंबीर मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी शासकीय पातळी वरील अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्या साठी विशेष लक्ष देऊन मोलाचे सहकार्य केले. या महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल केज नगर पंचायती च्या वतीने कै.अजित दादा पवार आणि जिल्हाधिकारी साहेब व उप जिल्हाधिकारी दिपक वजाळे साहेब यांचे जाहीर आभार तमाम केज वासियांच्या वतीने व केज नगर पंचायतच्या वतीने गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी मानले आहे.

ही जागा केज नगर पंचायतीला हस्तांतरित होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे साहेब यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात या प्रकरणातील सर्व कायदेशीर अडचणी दूर करून प्रशासकीय प्रक्रियेला गती दिली होती,ज्याची आज या प्रसंगी कृतज्ञतेने आठवण काढण्यात आली.कागदपत्रांची अचूक पडताळणी आणि ताबा पावती तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष हस्तांतरणापर्यंत अहोरात्र कष्ट घेऊन अतिशय मोलाचे सहकार्य केले.या दोन्ही महसूल अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला असून केज शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून रस्त्याच्या कडेवर बसुन हातावर पोट भरणाऱ्या व्यवसायीकांच्या जिव्हाळ्याचा मोठा प्रश्न मिटणार आहे.

मागील चाळीस वर्षापासून जी फरफट व्यवसाय धारकांची चालू होती ती आता मिटणार असून केजच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा आपल्या कार्यकाळात पूर्ण होत असल्याचा आनंद होत असून या कामी आजी, माजी,सर्व राजकीय नेत्यांचे तसेच अधिकाऱ्यांचे आभार इनामदार व बनसोड यांच्याकडून मानण्यात आले.याकामी सर्व यंत्रणा अगदी पारदर्शक पणे राबवून छोट्या व्यवसाय धारकांच्या रोजी रोटीचा प्रश्न तात्पुरता मिटणार आहे यामुळे केज शहर वासियांकडुन तसेच व्यवसाय धारक आणि नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि कै.अजितदादा पवार,खासदार बजरंग बप्पा सोनवणे व मा.खा. रजनीताई पाटील यांच्या पाठबळामुळे,तसेच उप जिल्हाधिकारी वजाळे साहेब,दिवंगत तहसील दार राकेश गिड्डे साहेब व तलाठी साहिल इनामदार यांच्या प्रशासकीय सहकार्यामुळे केज नगरपंचायतीला हक्काची जागा मिळाली आहे.

या जागेवर सार्वजनिक प्रकल्प,छोट्या व्यवसाय धारकांसाठी तात्पुरते दुकान आदी प्रश्न मिटणार आहेत तसेच प्रशासकीय इमारत तसेच नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, व्यवसायधारकांनी तसेच केजवासीयांनी गट नेते हारुणभाई इनामदार, नगरपंचायत च्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड आणि सर्व नेत्यांचे तसेच महसूल प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत.

या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते हारूणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,जनविकास परिवर्तन आघाडीचे गट नेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार,लखन हजारे, व्यापारी प्रतिनिधी महेश जाजू यांच्यासह अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!