सामाजिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेवून उत्साहात संपन्न

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक ६ जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा ग्रंथप्रदर्शन, व्याख्यान,रंगभरण स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेवून जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.सकाळी ९ ते ५ पर्यंत ग्रंथप्रदर्शन घेण्यात आले.याच दरम्यान सकाळी ९ ते १० या वेळात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत प्रथम – गौरी ज्ञानेश्वर गायकवाड,द्वितीय शिवानी भगत यांनी प्राविण्य मिळविले.

१० ते ११ या वेळात सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगननाना गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.त्यानंतर ११ ते १२ या वेळात रंगभरण स्पर्धा घेण्यात अली.या स्पर्धेत प्रथम -विक्रमगायकवाड, द्वितीय – शिवानी भगत यांनी प्राविण्य मिळविले.

त्यानंतर निबंध स्पर्धा घेण्यात आली.यात प्रथम – गौरी गायकवाड,द्वितीय – आनंद गायकवाड यांनी प्रविण्य मिळविले. परिक्षक म्हणून सेवा निवृत्त मुख्याध्यापक छगननाना गायकवाड यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धकांना प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड,परिक्षक छगननाना गायकवाड, ए.बी.गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.शेवटी अध्यक्षीय समारोप डाॅ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.

आपल्या अध्यक्षीय समारोपात शिव राज्याभिषेक सोहळा या विषयी सविस्तर विवेचन करून शिवरायांच्या जनकल्याण विषयक कार्याची महती सांगीतली.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, पर्यावरण विषयकधोरण, महिला विषयक धोरण, परराष्ट्रधोरण,गड किल्ले विषयक धोरण,संरक्षण विषयक धोरण,जल संवर्धन विषयक धोरण, दळणवळण विषयक धोरण,राज्य कारभार विषयक धोरण, शक संवत विषयक धोरण, रयतेच्या कल्याणाचे धोरण, आर्थिक धोरण, राजनैतिक धोरण,जमीन सुधारणा विषयक धोरण शेतसारा – शेतमोजणी विषयक धोरण,परराष्ट्र धोरण, आरमार विषयक धोरण,कायदे विषयक धोरण अशा प्रकारची अनेक धोरणे आखून रयतेच्या हिताचे निर्णय व धोरणे राजांनी आखली व पूर्णत्वास नेली.

राजाभिषेकाच्या निमित्ताने अष्टप्रधान मंडळ नेमून लोकशाही ची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याण हेच उदिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन राज्यकारभार केला असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!