भाजपा नेते रमाकांत मुंडे यांनी केली मयत सोमीनाथ मुंडेच्या कुटुंबाला केली आर्थीक मदत

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगांव येथील ऊसतोड मजूर सोमीनाथ लक्ष्मण मुंडे यांचे एप्रिलमहिन्यात अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाची शनिवार दि.६ जून रोजी भाजपाचे जेष्ठ नेते रमाकांत बापू मुंडे यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.यावेळी गावातील तरुण युवक व नागरीक उपस्थित होते.
केज तालुक्यातील देवगांव येथील ऊसतोड मजूर सोमीनाथ लक्ष्मण मुंडे यांचे एप्रिल महीन्यात अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या घरातील पत्नी, लहान तीन मुले यांची दि.६ जून शनिवार रोजी भाजपाचे जेष्ठ नेते रमाकांत बापू मुंडे यांनी भेट घेऊन त्यांच्या कुंटूबांला धिर देऊन मयत सोमिनाथ मुंडे यांच्या पत्नी व मुले यांच्याकडे आर्थिक मदत करुन त्यांच्या दु:खात सहभागी असल्याने रमकांत बापू मुंडे यांनी सांगीतले.यावेळी देवगांवचे माजी सरपंच रामराव मुंडे,ग्रा.प.सदस्य छंदर मुरकुटे, पांडूरंग मुंडे, हनुमंत नागरगोजे, बापूसाहेब मुंडे,रामेश्वर नागरगोजे, पांडूरंग नागरगोजे,गोरख मुंडे हे यावेळी उपस्थित होते.



