सामाजिक
स्वा.सावरकर जयंतीच्या निमित्ताने पेशवा प्रतिष्ठान तर्फे बिनव्याजी शैक्षणिक मदतीचे वाटप

अंबाजोगाई/प्रतिनिधी
समाजातील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना पेशवा प्रतिष्ठान तर्फे बिनव्याजी शैक्षणिक मदत केली जाते.यावर्षी स्वातंत्रवीर सावरकर जयंती निमित्त पार्थ कानसुरकर यास बिनव्याजी शैक्षणिक मदतीचे वाटप करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते पन्नास हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सर्वप्रथम स्वातंत्र्य वीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी गट शिक्षण अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, विवेक देशमुख,राहुल कुलकर्णी,डॉ.महेश अकोलकर,शिरीष हिराळकर,डॉ.संकेत तोरंबेकर,विवेक बाभुळगावकर,श्रीकांत जोशी,अक्षय देशमुख, केदार दामोशन,गौरव कुलकर्णी,विलास कानसुरकर यांची उपस्थिती होती.



