
केज/प्रतिनिधी
दि.२९ मे २०२६ रोजी श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान मार्फत पायल ब्युटी पार्लर केज येथे एक महिन्याचे कॉस्मेटोलॉजी प्रशिक्षण तरुण उद्योजक मुली व महिलांसाठी घेण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती संगीता इंगोले मॅडम व सचिव श्री.जी.बी.चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पायल ब्युटी पार्लरच्या प्रो.प्रा. सायरा सय्यद मॅडम यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले यात त्यांनी कॉस्मेटोलॉजी म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये असलेल्या विविध ट्रेनिंग फेशियल,ब्लिचिंग, क्लीनअप सारख्या विविध प्रकारच्या ट्रेनिंग चालू असलेल्या प्रशिक्षणा मधील प्रशिक्षणार्थींना सखोल सराव घेऊन शिकवले व कॉस्मेटोलॉजी हे भविष्यात नवीन उद्योजकांसाठी व्यवसायाचे एक साधन बनू शकते हे स्वतःच्या उदाहरणातून समजावून सांगितले.श्री जी.बी. चौधरी सर यांनी तरुण उद्योजकांसाठी शासना च्या असलेल्या विविध योजनांचे सखोल मार्गदर्शन उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थींना केले.
हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी समुपदेशक कु.तृप्ती शिंदे व सर्व प्रशिक्षणार्थींनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन केले.या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कोषाध्यक्ष व सदस्यांनी आभार व्यक्त केले आहेत.



