शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी येणाऱ्या गफूर सय्यद चे हृदयविकाराच्या धक्याने निधन,दहा दिवसांपूर्वी मुलाचा मृत्यू झाला होता

केज/प्रतिनिधी
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिव संवाद मराठवाडा दौरा सुरू असून शुक्रवार रोजी केज येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी त्यांनी दहा दिवसांपूर्वी मुलाचे निधन झाल्याने रसुल गफूर सय्यद हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.त्यांना तातडीनं केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रसूल सय्यद यांचे दुर्दैवी निधन झाले.
या घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रसूल सय्यद यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले,खासदार संदीपान भुमरे,माजी आमदार प्रा.सौ.संगीता ठोंबरे,युवा सेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.
पाच लाखाची मदत…
या भेटी दरम्यान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रसूल गफूर सय्यद यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली.तसेच रसूल गफूर सय्यद यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेईल,असे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आश्वासन दिले.



