बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन,इंधन टंचाई व दरवाढ तात्काळ कमी करा – राहुल सोनवणे


बीड/प्रतिनिधी
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात सुरू असुन आज बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांच्या नेतृत्वात बीड येथे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे म्हणाले की, सध्या शेतीच्या मशागती चे दिवस सुरू असून पेट्रोल डिझेल टंचाई व दरवाढ सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान व मानसिक हानी सुरू आहे मात्र पंतप्रधान मोदी परदेशात जावून चॉकलेट वाटण्याचे लाजिरवाणे काम करत आहेत.
मागील बारा वर्षापासून देशात आणि राज्यात भाजपची एक हाती सत्ता असताना देखील महागाईवर कुठलेही नियंत्रण यासरकरचे दिसत नाही.लोकहिता च्या कुठल्याही योजना न आणता मन की बात करत देशातील जनतेची फसवणुक करण्याचे काम नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष करत असुन वाढलेली महागाई हे या सरकारचे नाकरते पणाचे लक्षण आहे.
जर इंधनाचा तुटवडा कमी करून दरवाढ कमी न केल्यास येणाऱ्या काळात बीड जिल्ह्य काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले.यावेळी प्रवीणकुमार शेप, बाळासाहेब ठोंबरे, दादासाहेब मुंडे,गणेश राऊत,गणेश बजगुडे, महावीर मस्के,परवेज कुरेशी,मीनाक्षी ताई पांडुळे,दत्ता कांबळे, संभाजी जाधव,प्रकाश मुंडे,राहुल जाधव,प्रवीण खोडसे, सय्यद फारुख, आकाश गायकवाड, शिवाजी कोटुळे,शिवाजी देशमुख,इलियास टेलर, शेख मोहसिन,शेख अमर,गणेश कारंडे,शेख नौशाद,अशोक केदार, अशोक बहिरवाल, विशाल मस्के,हरिभाऊ सावंत,राम शेळके,शेख मुशर्रफ,अविनाश दरपे, उद्धव जोगदंड,विजय पवार,कल्याण टेकाळे, विष्णू मस्के,मनोहर गीते, शेख जाहीर,शाम मुंडे, दीपक कराड, जमील खान यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.



