

केज/प्रतिनिधी
दि.२८ मे २०२६ गुरुवार रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.शालु विजय थोरात व या शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म दि.२८ मे १८८३ रोजी महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला.वडील दामोदर सावरकर व आईचे नाव राधाबाई तसेच पत्नीचे नाव यमुनाबाई होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी,समाज सुधारक,मराठी कवी व मराठी लेखक होते.ते हिंदू तत्त्वज्ञ होते.
पारतंत्र्यातील भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी जिद्दीने व कसोशीने प्रयत्न केले.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.शालु विजय थोरात,सर्व सदस्य, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ ता.केज या शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम,डॉ.रामकिशन ग्यानबा मुळे सर, श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर,श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,श्रीमतीअंजली गोविंदराव उटीकर मॅडम, राहुल बजरंग बचुटे सर, आबासाहेब तुळशिराम धपाटे सर,पीएमओ पोषण शक्ती निर्माण योजना कामगार सौ.स्वर्णमाला पवार, सौ.अनिता पवार, विद्यार्थी व विद्यार्थीनी हे उपस्थित होते.शेवटी राहुल बजरंग बचुटे सर यांनी आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.



