सामाजिक

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागा च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी महाराष्ट्रातून भानुदास माळी यांची नियुक्ती

बीड/प्रतिनिधी

ओबीसी नेते श्री. भानुदास माळी यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश कमिटी ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदी ५ वर्षे कार्यरत राहून महाराष्ट्रात वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने ओबीसी समाजातील लहान घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला व पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देऊन प्रदेशाध्यक्ष पद अत्यंत निष्ठेने सांभाळले. भानुदास माळी यांनी गाव पातळी पासून पासून मुंबई ते दिल्ली पर्यंत विविध सामाजिक राजकीय आंदोलनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.अनेक वेळा ओबीसींच्या प्रश्नावर जन आंदोलने मेळावे व शिबिर ही घेण्यात आली.

कार्यकर्त्यांमध्ये ओबीसी व काँग्रेस पक्षात उत्साह कामाच्या माध्यमातून वाढविला.तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी असून,त्यांच्या या अनुभवाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला नक्की होईल.पक्षाचे संघटन व पक्षाचे विविध कार्यक्रम तसेच जनतेचे व कार्यकर्त्यांची प्रश्न पक्ष व प्रशासनामध्ये व्यवस्थित हाताळल्यामुळे भानुदास माळी यांचे कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर निवड केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली असून त्याचा सार्थ अभिमान महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना आहे.ज्या लोकांनी महाराष्ट्रा मध्ये ओबीसी काँग्रेस संघटन उभे केले त्या लोकांना न्याय मिळाला आहे. ‌नियुक्ती जाहीर झाल्या नंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच खा.मुकुल वासनिक,प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार,माजी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण भानुदास माळी यांना काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पक्ष मजबूत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!