सामाजिक

अवकाळी पाऊस,चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी,युवा नेते ऋषीकेश भैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली केज तहसीलदारांना निवेदन

 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील युसुफवडगाव आणि आडस महसूल मंडळा मध्ये शनिवार,दि.२३ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व भयानक चक्रीवादळामुळे शेती पिकांचे,फळबागा वीज व्यवस्थेचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या नैसर्गिक आपत्ती मुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी यानुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी केज तहसीलदार यांच्याकडे एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे.अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा केज पंचायत समितीचे माजी उप सभापती,युवा नेते श्री. ऋषीभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.या चक्री वादळ आणि पावसामध्ये मौजे सोनिजवळा येथील शेतकरी कै.दिगांबर ससाणे यांचा अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.या धक्कादायक घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून,ससाणे यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तात्काळ आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी,अशी आग्रही मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.तसेच वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली.

चक्रीवादळाच्या तीव्रते मुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब आणि तारा उन्मळून पडल्या आहेत,तर काही ठिकाणी त्या अत्यंत धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहेत.यामुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडू नये,यासाठी संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून ही यंत्रणा त्वरित दुरुस्त करावी,अशी सूचनाही निवेदनात मांडण्यात आली आहे.यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रशासनाला निवेदन देताना युवा नेते ऋषी भैय्या आडसकर यांच्या सोबत अंकुशराव इंगळे सभापती,केज कृषी उत्पन्न बाजार समिती, रणजित दादा आडसकर युवा नेते,अमर भैय्या पाटील तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शिवदास थळकरी युवाध्यक्ष,गोविंद ससाणे तालुकाध्यक्ष, ओबीसी सेल,कैलास पाटील संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती तथा सरपंच,सुशिल अंधारे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!