प्रशासकीयसामाजिक

केजच्या पशु वैद्यकीय दवाखाण्या समोरील अतिक्रमणाकडे प्रशासनाचा नेहमी प्रमाणे काना डोळा 

केज / प्रतिनिधी

शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याची मोहिम १३ मे बुधवार रोजी सुरु झाली. यामध्ये केज शहरातील पंचायत समिती व तहसील कार्यालया समोरील आणि (फलोत्पादन) जिरायत खात्याच्या जागेवर केलेले अतिक्रमणे काढण्यात आले पण केज पंचायत समीतीच्या अंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाण्या समोरील जागेवरील अतिक्रमण काढण्याकडे केज प्रशासनाच्या अधिका-यांनी काना डोळा केल्याचे शहरातील जनतेच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहे.तरी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन व सि.ओ.जितिन रहमान यांनी स्वतः लक्ष घालून हे अतिक्रमण काढावे असे केजच्या जनतेतून बोलले जात आहे.

केज शहरातील तहसील कार्यालया समोरील रस्त्यावरील, पंचायत समितीच्या समोरील,फलोत्पादन जागेच्या समोरील रोडवरील,अतिक्रमणे ही १३ मे बुधवार रोजी प्रभारी तहसीलदार पंचायत समितीचे कर्मचारी,कृषी कार्यालयाचे कर्मचारी,नगरपंचायतचे कर्मचारी यांना सोबत घेऊन केजचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे,सहा.पो.मांजरमे यांनी पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

केज शहरातील पंचायत समितीच्या पाठीमागील उमरी रस्त्यावरील व तालुका आरोग्य कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखान्या समोर राज्यमार्गावरील ,केज तहसीलचे जुने गोदाम, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हैदराबाद बँक ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, कानडी रोड, जिल्हा परिषद शाळेची पश्चिम दिशा या भागातील अतिक्रमण हे काढले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या २५ वर्षापूर्वी बांधकाम अभियंता सराफ साहेबांनी केज शहरातील शासकीय विश्रामगृह ते केजडी नदीपर्यंत केज शहरातील दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढले होते. त्या प्रमाणेच केज शहरातील राज्य मार्गावरील अतिक्रमण काढून राज्य मार्ग मोकळा करण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन व बीडचे सि.ओ.जितिन रहमान यांनी स्वःतहा लक्ष घालून हे अतिक्रमण काढावे असे केजच्या जनतेतून बोलले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सराफ साहेबांनी २००२ ला केज शहरातील शासकीय विश्रामगृह ते केजडीनदी पर्यंत जसे अतिक्रमण काढले होते तसेच काढून राज्य मार्ग मोकळा केला तरच शहरातील अतिक्रण प्रक्रिया यशस्वी होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!