श्रेयस सोमनाथ स्वामी याला दहावी परीक्षेत ९९.४० टक्के गुण, सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

अंबाजोगाई/प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद विद्यालय अंबाजोगाई येथील विद्यार्थी चि. श्रेयस सोमनाथ स्वामी याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
श्रेयसने सातत्यपूर्ण अभ्यास,मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्याला शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच आई-वडिलांनी दिलेली प्रेरणा आणि अभ्यासा साठी निर्माण केलेले शैक्षणिक वातावरण यामुळे त्याच्या यशात मोठा वाटा राहिला.
श्रेयसचे वडील श्री. सोमनाथ स्वामी हे जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक म्हणून परिचित आहेत.शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा आणि शिस्तप्रिय स्वभावाचा लाभ श्रेयसला झाला.या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून श्रेयसवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.


