शैक्षणिक

बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी निकाल उज्वल सेमी इंग्रजी विभागाचा ९८ टक्के निकाल ; २७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बनसारोळा चा मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल उज्वल लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.विद्यालयाचा सेमी इंग्रजी विभागाचा निकाल तब्बल ९८ टक्के लागला असून २७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवतशाळेचा गौरव वाढविला आहे.

विद्यालयातील कु.स्नेहल ज्ञानेश्वर जोशी हिने ९७.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.कु.सृष्टी अशोक पांचाळ हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय तर कु.अक्षरा अमोल गोरे हिने ९४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

याशिवाय कु.वैष्णवी बालासाहेब सोनके९४%, चि.प्रसाद ज्ञानेश्वर पवार ९२.६०%, कु.प्रेरणा सुनील वाघमारे ९१.२०%, कु.स्नेहा बिभीषण पौळ ९०.६०% यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात ९० पेक्षा अधिक गुण मिळवत विशेष यश प्राप्त केले असून इंग्रजी विषयात १०० पैकी ९७ गुण मिळवत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे.विशेष म्हणजे विद्यालयातील तब्बल तीन विद्यार्थ्यांनी गणित विषयात पैकीच्या पैकी १०० गुण मिळवत विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, परिश्रम आणि विद्यार्थ्यांची मेहनत असल्याची भावना पालकांतून व्यक्त होत आहे.शाळेतील सर्व विद्यार्थी नियमित अभ्यास,जादा तासिका आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मेहनत घेत असल्यामुळेच हे उज्ज्वल यश संपादन करता आले असल्याचे सांगितले जात आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे,सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक बालासाहेब काकडे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!