शैक्षणिक

जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित,स्वामी विवेकानंद शाळेच्या १०० टक्के निकालासह उज्वल यशाची परंपरा कायम,आकांक्षा सांजुरे, ज्ञानदा गायकवाड,प्रज्ञा घुले,स्वानंद कुलकर्णी १०० पैकी १०० टक्के गुण मिळवुण स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतुन सर्वप्रथम ; ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे एकूण १४५ विद्यार्थी

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित,स्वामी विवेकानंद विद्या मंदिर [माध्यमिक विभाग] केज या शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्च- २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस. सी.बोर्ड परिक्षे मध्ये घवघवीत यश संपादन केले.या शाळेचे विद्यार्थी सांजुरे आकांक्षा दीपक,गायकवाड ज्ञानदा सुनील,घुले प्रज्ञा दिनकर, कुलकर्णी स्वानंद संतोष या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण संपादीत करून शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

कदम प्रणवी नेताजी ही ९९.४० टक्के गुण मिळवून द्वितीय आली.तर बोबडे प्रतिक रविंद्र ९९.२० टक्के गुण मिळवून शाळेतुन तृतीय आला. या परीक्षेस एकूण १९२ विद्यार्थी बसले होते. शाळेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असुन विशेष प्राविण्या सह १४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रथम श्रेणीत ३६, द्वितीय श्रेणीत १० तर तृतीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.तर ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे एकूण ७० विद्यार्थी आहेत.

शाळेतील ९८ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी-चाटे श्रावण रामदास ९९.००,बनसोडे श्रेयस रघुनाथ ९९.००, मुंडे अमृता महादेव ९९.००,साखरे सई बालाजी ९९.००,चाटे सोहम लक्ष्मण ९८.८०, भिसे अभिनव श्रीहरी ९८.८०, सुर्यवंशी प्रिया सतिश ९८.६०, नेहरकर मनस्वी नारायण ९८.६०,वाळके अनुष्का विकास ९८.६०,थोरात अस्मिता अशोक ९८.२०

बेडसकर शिवम सुग्रीव ९८.००,पौळ सोनल अंबऋषी ९८.०० वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, उपाध्यक्ष नईमोद्दीन इनामदार,सचिव जी.बी. गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ,कोषाध्यक्ष फजिलोद्दिन काजी, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, स्वयंअर्थ सहाय्यित शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायणराव अंधारे,शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,प्रा.वि चे मु.अ. वसंत शितोळे,स्व.प्रमोद महाजन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर भैरट स्वयंअर्थ सहाय्यित शाळेचे मु.अ. संघपाल मस्के तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!