कृषीसामाजिक

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा;तूर आणि हरभरा खरेदीला केंद्र सरकारकडून मुदतवाढ, हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात ५८ हजार टनांची वाढ,पणनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई/प्रतिनिधी

राज्यातील तूर आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत तूर आणि हरभरा खरेदी साठी मुदतवाढ देण्या सोबतच,हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात ५८ हजार ६३२ मेट्रिक टनांची मोठी वाढ करण्यात आली आहे.या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आपला शेतमाल आधारभूत किमतीत (MSP) विकण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि संधी उपलब्ध झाली आहे.

मुदतवाढ आणि सुधारित उद्दिष्ट

राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या निर्णयाची माहिती दिली.त्यांच्या विनंती नुसार केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या मुदतवाढीला मंजुरी दिली आहे.आता तूर खरेदीची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत,तर हरभरा खरेदीची मुदत २९ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.तसेच, राज्यासाठी हरभरा खरेदीचे एकूण उद्दिष्ट आता ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन इतके झाले आहे.

राज्य शासनाचा यशस्वी पाठपुरावा

यापूर्वी किमानआधारभूत किंमत (MSP) योजने अंतर्गत तूर खरेदीसाठी ९० दिवस आणि हरभरा खरेदीसाठी ६०दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र,अनेक शेतकऱ्यांचा माल अद्याप विक्रीविना असल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी होत होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकार कडे यासंदर्भात विशेष पाठपुरावा केला होता.

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

या निर्णयाबद्दल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.हरभरा खरेदीच्या कोट्यात झालेली वाढ आणि दोन्ही पिकांच्या खरेदीला मिळालेली मुदतवाढ यामुळे शेवटच्या शेतकऱ्याचा माल खरेदी करणे सरकारला शक्य होईल,असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे बळीराजाला मोठे आर्थिक संरक्षण मिळाले असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!