सामाजिक

केज तालुक्यात रानडुकरांचा थरार ; शिंदी,गप्पेवाडीतील सहा शेतकऱ्यांवर हल्ला एकजण गंभीर जखमी 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील बालाघाट डोंगरी रांगाच्या परिसरातील शिंदी आणि गप्पेवाडी शिवारात रान डुकरांच्या कळपाने घातलेल्या थैमानामुळे केज तालुका हादरला असून,शेतात काम करणाऱ्या सहा शेतकऱ्यांवर रानडुकरांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे ते रक्त बंबाळ होऊन जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

वनविभागाने आता तरी जागे व्हावे!  

सतत होणाऱ्या रान डुकरांच्या हल्ल्यांमुळे डोंगरी भागातील शेतकरी दहशतीखाली आहे.वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत मिळवून द्यावी,अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व अॕड.शरद इंगळे यांनी केलीआहे.वनविभागाच्या निष्काळजीपणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून,याप्रकरणी प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे नेमकी घटना ?

शिंदी आणि गप्पेवाडी येथील शेतकरी नेहमी प्रमाणे बुधवार दि. ७ मे रोजी सकाळीच आपल्या शेतातील कामात व्यस्त असताना सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान अचानक रानडुकरांच्या एका मोठ्या कळपाने त्यांच्यावर झडप घालून हल्ला केल्याची घटना घडली आहे .हा हल्ला इतका अनपेक्षित आणि भीषण होता की, शेतकऱ्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.

जखमींच्या ओरडण्याने परिसरात खळबळ उडाली आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.जखमींना तात्काळ वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.उत्तम बाबू केदार(प्रकृती गंभीर – बीड जिल्हा रुग्णालय),आश्रूबा राजाभाऊ देशमुख व पंचफुला दिगंबर जाधव (स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, अंबाजोगाई),ज्ञानेश्वर बापू पोते (उप जिल्हा रुग्णालय,केज). चंद्रसिंग सखाराम पोते व फुलचंद मोहन पोते (प्राथमिक आरोग्य केंद्र, विडा)

नंदकिशोर मुंदडा यांची तत्परता…

घटनेचे गांभीर्य ओळखून अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि ॲड.शरद इंगळे यांनी तातडीने जखमींना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी त्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.व जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!