
मुंबई/प्रतिनिधी
आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे आणि शिस्तप्रिय प्रशासनामुळे ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाला मोठी बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रदीर्घ अनुभव आणि पहिल्या महिला आयपीएसचा मान
मीरा बोरवणकर या १९८१ च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा बहुमान त्यांच्या नावावर आहे.आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या आणि खळबळजनक प्रकरणांचा छडा लावून गुन्हेगारांमध्ये एक दरारा निर्माण केला होता. पोलीस दलातील विविध उच्च पदे यशस्वीपणे भूषवल्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर महिला आयोगाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महिलांच्या प्रश्नांना मिळणार न्याय
राज्यातील महिलांवरील अत्याचार,त्यांचे हक्क आणि सक्षमीकरण या आघाड्यांवर बोरवणकर यांचा प्रशासकीय अनुभव अत्यंत मोलाचा ठरणार आहे.त्यांच्या निवडीमुळे महिलांच्या तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे आणि वेगाने होईल,अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीमुळे महिला आयोगाच्या कामकाजात एक नवी शिस्त आणि गती येईल.त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्यातील लाखो महिलांना होईल.त्यांचा
प्रशासकीय अनुभव
४ दशकांहून अधिक काळ पोलीस दलात सेवा केलेली आहे तसेच धाडसी निर्णयांसाठी ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळख आहे.महिलांचे हक्क,संरक्षण आणि सक्षमीकरणावर भर देण्यास मदत होणार आहे.मीरा बोरवणकर यांच्या या नियुक्तीचे राजकीय,सामाजिक आणि प्रशासकीय अशा सर्वच स्तरांतून जोरदार स्वागत होत आहे. लवकरच त्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील अशी माहिती मिळाली आहे.



