गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आई, वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी 

केज/प्रतिनिधी

केज येथील अल्पवयीन मुलीचा दि.१४ एप्रिल रोजी पाठलाग करून तीला कळंब रोड परिसरातील आपल्या घरी घेवून जाऊन दुपारी १ ते ३ च्या दरम्यान तीची छेडछाड करून व बळजबरीने तीचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितलेस तर तुझ्या आई,वडील,व भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.परंतु दोन दिवसापूर्वी घडलेल्या प्रकारांची माहिती मुलीने आपल्या आईला दिली आणि पिडीत मुलीच्या फिर्यादी वरून रेहान रियाज शेख रा.कळंब रोड,केज याचे विरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.

केज येथील १५ वर्षे १० महिने २८ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा दि.१४ एप्रिल २०२६ रोजी पाठलाग करून तीला कळंब रोड परिसरातील आपल्या घरी घेवून जाऊन दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान तीची छेडछाड करून,बळजबरीने तीचे कपडे काढून बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध केले.या घटनेबद्दल कोणाला कांही सांगितलेस तर तुझ्या आई,वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.

पिडीत मुलीला व्हीडिओ कॉल करून त्याचा स्क्रिनशॉट काढून तीच्या मोबाईल वर पाठविला.त्याच्या पेन ड्राईव्ह मध्ये बळजबरीने अत्याचार केलेला व्हीडिओ तीला दाखविला.व यापुढे तु आता मी सांगेल तसेच वागायचे असे म्हणुन कपडे काढायला सांगितले असता मुलीने विरोध केला असता तुझे व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितल्या नंतर १५ वर्षे १० महिने २८ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून रेहान रियाज शेख रा. कळंब रोड,केज याच्या विरुद्ध शनिवारी उशिरा गून्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करीत आहेत.

आरोपीला पोलीस कोठडी

या प्रकरणातील आरोपी रेहान रियाज शेख याला पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी जेरबंद केले असून, आरोपीला रविवारी केज न्यायालयात हजर केले आसता केज न्यायालयाने आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!