कृषीसामाजिक

केज तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा ; तहसील कार्यालया समोर बैलगाडीला पेट्रोल टाकून लावली आग.

केज/प्रतिनिधी

कोरडेवाडी ता.केज येथे धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्रीताई राठोड या गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत.त्यांच्या उपोषणाकडे आणि मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज मोठ्या संख्येने बैलगाडी मोर्चा काढून केज तहसील कार्यालयावर धडक दिली.

यामोर्चाचे नेतृत्व बाळराजे आवारे पाटील यांनी केले. तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलकांनी रोष व्यक्त करत बैलगाडी वर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली.यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. कोरडेवाडी येथील साठवण तलाव मंजूर करावा.ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यात याव्यात.

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी रु ५०,००० नुकसान भरपाई देण्यात यावी.या मागण्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याने शेतकरी वर्गा मध्ये संतापाची लाट आहे. राजश्रीताई राठोड यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांच्या आरोग्याचीही स्थिती चिंताजनक होत चालली आहे. आंदोलकांनी चेतावणी दिली की, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!