डॉ.अशोक थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त होळ येथे आरोग्य तपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद, ४०० ते ४५० रुग्णांची तपासणी


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील होळ येथे डॉ.अशोकराव थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात दंत तपासणी व नेत्रतपासणी झाली.या शिबिरात ४०० ते ४५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ६० रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला असून त्यांची ईसीजी तसेच आवश्यक ती रक्त तपासणी करण्यात आली.
या सर्व रुग्णांच्या दोन टप्प्यांमध्ये केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.या आरोग्य शिबिरासाठी डॉ.स्नेहल सागर नेत्ररोग तज्ञ,डॉ. नितीन चव्हाण नेत्ररोग तज्ञ,डॉ.प्रशांत शिंदे दंतरोग तज्ञ,इरफान पठाण ई सी जी टेक्निशियन,वैभव आडसकर एमपीडब्ल्यु किरण पोटभरे,सिद्धवी सोनटक्के वैष्णवी,शितल ठोंबरे,लता शिंदे,रोहिणी शिंदे आदी जणांनी सहकार्य केले.
शिबिरा साठी गावाचे सरपंच योगेश भैया शिंदे,उप सरपंच बाळासाहेब घुगे, नारायण आबा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी दादा,संदीपान घुगे,अशोक घुगे,ॲड. राजेभाऊ शिंदे,संग्राम भैय्या शिंदे,प्रसिद्ध वक्ते दत्ता घुगे,गावातील ज्येष्ठ मंडळी व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व लालासाहेब शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा आरोग्यशिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळतअसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.



