सामाजिक
पत्रकार श्रावण कुमार जाधव यांना मातृशोक, शांताबाई देविदास जाधव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील लहुरी येथील श्रीमती शांताबाई देविदास जाधव वय ८५ यांचे रविवारी दि.१५ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लहुरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ७ वाजता गावातील सार्वजनिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.त्या दैनिक झुंजारनेताचे ज्येष्ठ पत्रकार श्रावणकुमार जाधव यांच्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक,मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.



