सामाजिक

आजच्या मुला मुलींना चांगले संस्कार आणि योग्य दिशा देणे आपली जबाबदारी आहे – बबनराव आंधळे

बीड /प्रतिनिधी

बीड शहरातील अरुणा असफअली महिला मंडळ बीड संचलित,संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तेलगाव रोड, बीड या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक बबनराव आंधळे सर यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.आरकडे सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षक श्री.जाधव सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले गर्कळ मॅडम,सोनके मॅडम, ढाकणे सर,मुंडे सर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री.आरकडे सर यांनी यावेळी योग्य असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शेवटी अध्यक्षीय समारोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बबनराव आंधळे सर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल सर्वच भारतीयांना आदर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान लहान मुलं खूप आवडायची या मुलाबरोबर त्यांना गुलाबाची फुलेही आवडत असत म्हणून ते त्यांच्या कोटावर गुलाबाचे फुल लावत असत.

त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 झाली उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी झाला त्यांचा जन्मदिन हा भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो देशांमध्ये धर्मनिरपेक्षतेची भावना रुजवण्याचे कार्य पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षणविज्ञान आणि विकासाची त्रिसूत्री त्यांनी अंमलात आणली या त्रिसूत्रीमुळेच देशांनी वैज्ञानिक प्रगती केली देशातील साक्षरता प्रचंड वाढली आणि विकासात देश अग्रेसर झाला पंडित जवाहरलाल नेहरू हे एक आदर्शवादी आणि वैचारिक प्रतीक होते त्यांचा असा विश्वास होता की जे आपले ध्येय तत्व आणि आदर्श विसरतात त्यांना यश मिळत नाही पंडित जवाहरलाल नेहरू हे असे राजकारणी होते ज्यांनी प्रत्येकाच्या जीवनावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकाश टाकला आहे एवढेच नाही तर पंडित नेहरूंना समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताकचे शिल्पकार ही मानले जात होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जाधव सर यांनी अगदी उत्कृष्टपणे केले यानंतर शेवटी शाळेचे शिक्षक मुंडे सर यांनी सर्वांचे आभार मानले व शेवटी शाळेतील बालकांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!