राजर्षी शाहु विद्यामंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

केज/प्रतिनिधी
केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत साहित्यसम्राट,लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व एम. टी.एस.ऑलंपियाड मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार हा संयुक्त कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी मंचावर सेवानिवृत्त शिक्षक श्री. एस.ए.डापकर व ज्येष्ठ शिक्षक श्री.व्ही.बी. यादव यांची उपस्थिती होती.सर्व प्रथम लोक शाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
एम.टी.एस.ऑलंपियाड स्पर्धेतील गुणवंत चि. नीरज आकाश पवार, चि.सुरज बालासाहेब घुले,कु.समर्थ रंजित जाधव,चि.सिद्धांत राजू वंजारे,चि.सार्थक दत्तात्रय पतंगे,चि. प्रथमेश लक्ष्मण चौरे,कु. आर्या अनिल निंगूळे, कु.भक्ती धनंजय सिरसट,कु.कृष्णाई बन्सी पाटोळे,कु.तनुजा लक्ष्मण ढाकणे,कु.सृष्टी जितेंद्र रोडे,कु.श्रेया गणेश सोळंके यांचे यथोचित अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु.ज्ञानेश्वरी प्रवीण देशमुख व कु.प्रगती सत्यप्रेम तपसे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी शाळे तील सहशिक्षक श्री. जे.आर.मस्के यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडून सांगितला.तर श्री. डापकर एस.ए.यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्या विषयी माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात श्रीमती चाटे बी.बी. मनोगत व्यक्त करताना सर्व गुणवंतांचे अभिनंदन करत शुभाशीष व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन देशासाठी, समाजासाठी चांगले काम करावे.आदर्श नागरिक होण्यासाठी महापुरुषांचे विचार मोलाचे काम करतात. कार्यक्रमाचे संचलन श्री.क्षीरसागर आर.एस. यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.ए. डी.देशमुख,श्री.जी.बी. डिरंगे,श्रीमती अनिता जाधव,श्रीमती ध्वजा गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



