सामाजिक

विद्यार्थ्यांसाठी दिलासा एमपीएससी फॉर्म भरण्यास मुदतवाढ खा. बजरंग सोनवणे यांच्या मागणीला यश

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ मे २०२६ पर्यंत वाढवली आहे.या महत्त्वपूर्ण निर्णयामागे बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्यासातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे मानले जात आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणींना मिळाला न्याय

राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना नाॕन क्रिमिलेअर,ईडब्ल्युएस प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नव्हती.महसूल विभागा तील विलंबामुळे हजारो पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ही बाब लक्षात घेऊन खासदार बजरंग सोनवणे यांनी एमपीएससी प्रशासनाकडे मुदत वाढीची मागणी केली होती.विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आयोगाने सकारात्मक निर्णय घेतला.

नवीन मुदतीचा तपशील

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि.१४ मे २०२६ (रात्री ११-५९ पर्यंत),ऑनलाईन शुल्क भरणा दि. १४ मे २०२६

चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख दि.१८ मे २०२६

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

या मुदतवाढीमुळे अजून अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळाली आहे.आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून आता ते निर्धास्तपणे अर्ज करू शकतात.

खासदार सोनवणे यांची भूमिका

खासदार बजरंग सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासन व आयोगाकडे ठामपणे पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.विद्यार्थ्यांनो, ही संधी गमावू नका वेळेत अर्ज पूर्ण करा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका असे आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!