सामाजिक

टाकळी येथे मानव उद्धार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून भीम जयंती निमित्त मोफत पाणी वाटप

केज/प्रतिनिधी

तालुक्यातील आनंदनगर टाकळी येथे दि.२७ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विविधसामाजिक व उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.मानव उद्धार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,टाकळी ही संस्था नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहून विविध उपक्रम राबवत असते. भीमजयंतीच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने गावातील नागरिकांना मोफत पाणी वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अतुल सोनवणे, उपाध्यक्ष पंडित बारगजे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच अरुण मस्के,बालाजी कांदे,जीवन सिरसट, किशोर सिरसट,महादेव सिरसट,सिद्धांत मस्के, समाधान सिरसट,पप्पू सिरसट आदींची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाद्वारे सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला असून,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!