सामाजिक

शॉर्टसर्किटने केली संसाराची राखरांगोळी ; पंचनामा पूर्ण झाला, कुटुंब रस्त्यावर 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून,मजुरी करून उदरनिर्वाह करणारे आलिम मेहबूब शेख यांचे राहते घर शॉर्ट सर्किट मुळे पूर्णतः जळून खाक झाले आहे.या आगीत त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणांत राखरांगोळी झाला.घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली,मात्र घरातील एकही वस्तू वाचू शकली नाही.डब्या मध्ये साठवून ठेवलेली रोख रक्कम,तसेच लग्नासाठी मोठ्या कष्टाने खरेदी करून ठेवलेल्या वस्तूही आगीत जळून खाक झाल्या.या घटनेची माहिती मिळताच संबंधित तलाठी गुळभिले मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या वतीने पुढील मदतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. आलिम शेख यांचा संसार हा रोजंदारीवर चालणारा असून,त्यांच्या कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावकऱ्यांकडून मदतीचा हात पुढे येत असून, प्रशासनानेही तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.गरिबांच्या संसारा वर आलेले संकट हे केवळ नुकसान नसून, त्यांच्या आयुष्याचा आधारच हिरावून घेणारे असते त्यामुळे सर्व स्तरा तुन वस्तुरुपाने,अन्नधान्य किंवा आर्थिक मदतीचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!