
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र डॉ.किरणकुमार रघुनाथ वैरागे (MBBS, MS) यांची सुपर स्पेशालिटी प्लास्टिक सर्जरी (M.ch in plastic Surgery )या अभ्यासक्रमासाठी बी.जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे येथे निवड झाली.एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी) चेवैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी (प्लास्टिक सर्जरी) साठी त्यांची निवड झाली.
अभ्यासू वृत्ती असलेले डॉ. किरणकुमार वैरागे हे सुपर स्पेशालिटी प्लास्टिक सर्जरीचे शिक्षण घेऊन रुग्णांची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या यशाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशीवचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चव्हाण तसेच डॉ.खैराटकर,डॉ.अजित डीकले,डॉ.प्रवीण गोवांदे, डॉ.हनुमंत सौदागर यांनी अभिनंदन केले आहे.



