सांस्कृतीक
केज शहरातील राजर्षी शाहु विद्यामंदिर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित,राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान माजी सैनिक श्री.व्यंकटराव ज्ञानोबा देशमुख वरपगावकर यांना देण्यात आला. याप्रसंगी शाळेच्यावतीने त्यांचा आदर सत्कार करण्यात आला.
ध्वजारोहणासाठी संस्थेचे सचिव श्री.गदळे जी.बी,सामाजिक कार्यकर्ते श्री.हनुमंत भोसले,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री.डापकर एस.ए व श्री.चौधरी बी.डी तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



