शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत फातिमा शेख यांची जयंती साजरी.

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेत मुस्लिम आद्य शिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमेस श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन केले व अभिवादन केले.फातिमा शेख यांचा जन्म दि.९ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे झाला.फातिमा शेख यांचा धर्म इस्लाम व त्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या.

त्या शिक्षिका व समाजसुधारक होत्या. फुले यांच्या शाळेत दलितांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम केले.त्यांनी १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत भाग घेऊन मोलाचे सहकार्य केले.फातिमा शेख यांनी सर्व धर्म आणि जातीच्या बालकांना शिकविले. त्यांनी लोकांच्या दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचे काम केले. अशा या मुस्लिम आद्य शिक्षिकेच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.

या शाळे तील प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.रामकिशन ग्यानबा मुळे सर, प्राथमिक पदवीधरशिक्षक श्री.संदिप मेघराज ठोंबरे सर,श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्री.आबासाहेब तुळशीराम धपाटे सर, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम यांनीही सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी केले व शेवटी संदिप मेघराज ठोंबरे सर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!